मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

10 ला होणार चंद्रपूर मनपा ची महापौर व उपमहापौर पदाची निवड ! #Chandrapur Municipal Corporation to hold election for Mayor and Deputy Mayor on February 10!

 


चंद्रपूर,  : महानगर चंद्रपूर चा निकाल लागून आज १० दिवसांचा कार्यकाळ उलटला असून काँग्रेस ला २७ तर बीजेपी ला २३ जागा मिळाल्या असून दोन्ही मोठे पक्ष बहुमत घेऊ शकले नाही त्यामुळे शिवसेना (उबाठा )+वंचित व अपक्षांना घेऊनच सत्ता स्थापन होऊ शकते. भाजप आणि काँग्रेस आपलीच सत्ता बसावी यासाठी प्रसारात असून १० ला कोण महापौर व उपमहापौर याची कोडी सुटणार आहे. 


चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरीता 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी, या निवडणुकीच्या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नियुक्ती केली आहे.

चंद्रपूरच्या पराभूत उमेदवारांना हे कां बरे सुचत नाही...!

महानगरपालिका आयुक्त यांनी महापौर व उपमहापौर या पदांच्या निवडणुकीकरीता विशेष सभेचा दिनांक व वेळ निश्चित करून मिळण्याबाबत विभागीय आयुक्त नागपूर यांना विनंती केली होती. सदर पदाच्या निवडणूकीकरीता विशेष सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल, अशी तरतूद आहे.

त्यानुसार आज मंगळवार दि. 27 रोजी  दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या बैठकीतील विचारविनिमयाअंती, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर या पदांच्या निवडणुकीकरीता 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता राणी हिराई सभागृह, चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त यांच्यातर्फे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी निर्गमित केले आहे.

गुरुवार, २२ जानेवारी, २०२६

चंद्रपूरच्या पराभूत उमेदवारांना हे कां बरे सुचत नाही...! #Why doesn't this occur to the defeated candidates of Chandrapur...?



चंद्रपूर (वि. प्रति.) : नुकतीच एका प्रादेशिक वर्तमानपत्रात एक बातमी वाचण्यात आली आणि चंद्रपुरच्या पराभुत उमेदवारांना 'हे कां बरे सुचनत नाही ?' असा प्रश्न यानिमीत्ताने उभा ठाकला.

नागपुरातील एका प्रभाग मधील चार ही भाजपचे उमेदवार पराभूत झाले. काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी निवडुन आले, त्यानंतर ही भाजपच्या पराभूत उमेदवारांनी एक अनोखा उपक्रम सुरू करून नागरिकांच्या घरी जावून भेटी घेणे, थेट संवाद साधणे, सुचना, अपेक्षा जागुन घेण्याच्या उद्देशाने 'जनतेच्या दारी' हा अभिनव उपक्रम राबविला असल्याची बातमी वाचण्यात आली.

चंद्रपुरामध्ये ६६ जागांसाठी ४५१ उमेदवार  रिंगणात होते. त्यात भाजप-काँग्रेस सोबत अन्य जणांना मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला. ३८५ उमेदवारांना या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. त्यात सगळ्यात जास्त पराभूत उमेदवार हे काँग्रेस-भाजप या मोठ्या पक्षाचे आहेत. चांगल्या चांगल्या दिग्गजांना या निवडणुकीत मतदारांनी पराभवाची धुळ चाखवली आहे. 'निवडणुक जिंकलो वा हरलो तरी लोकसेवा हीच खरी जबाबदारी आहे.' असा संदेश 'जनतेच्या दारी' या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जात आहे. आम्ही हरलो तरी आपल्या सेवेसाठी तत्पर होतो व आहो. हा संदेश देण्याचा प्रयत्न चंद्रपुरातील पराभूत उमेदवार कां बरे करीत नाही. आता हरले तरी पुढल्या खेपेला याच मतदारांसमोर त्यांना जायचे आहे. पराभवाचे  मंथन करताना कां  हरलो ? हि चूक पराभूत उमेदवारांना बहुतेक दिसत असेल त्याच कारणाने तो पुन्हा निवडणूक लढतो. अगदी कालपर्यंत मतदारांचे हात-पाय जोडणारा मात्र  पराभवानंतर लगेच नागरिकांशी संबंध तोडताना बघायला मिळते. 

पराभूत झाले तरी समाजसेवकांकडून नागरिकांना बारा महिने अपेक्षा असतात. 'गधे के सिर से सिंग गायब प्रमाणे आता उमेदवार गायब झाले आहेत. काही उमेदवार फक्त सोशल माध्यमांद्वारे पोस्टर बॅनरद्वारे मतदारांचे आभार मानून काही मोकळे झालेतर काहींनी असे करणे सुद्धा टाळले यात काही जण  तर मतदारांना शिव्या हासडत पानटपऱ्यांवर, सार्वजनिक स्थळांवर झालेल्या खर्चाचा केलेल्या कामांचा हिशोब देत बसले आहे. त्यापेक्षा पराभवानंतर ही नागरिकांशी संपर्क करून परस्पर आभार मागण्याचे त्यांना कां बरे सुचले / सुचत नसेल. 'जनतेच्या दारी' सारखा एखादा अभिनव उपक्रम राबविण्याची संकल्पना चंद्रपुरातील पराभूत उमेदवारांना कां बरे येत नाही, हे कळायला मार्ग नाही.  

निवडुन आल्यावर समाजसेवा करण्याचा "वेडा ध्यास"  पराभूत उमेदवारांना पुढच्या खेपेला तर नक्कीच निवडून येऊ असे महंत मतदारांना मात्र आता विसरला आहे. "ये पब्लिक है सब जानती है"  हे सुद्धा तो आता विसरला आहे. पुढल्या वेळेला चुका सुधारू, जोमाने कमला लागू  असे म्हणत स्वतःला पुचाकरण्यापेक्षा पराभवानंतर ही जनतेच्या संपर्कात राहण्याची बुद्धी कां बरे येत नाही. ईश्वर त्यांना अशी सद्बुद्धी प्रदान करो, हीच या निमीत्ताने अपेक्षा !

चंद्रपूरातील २० हजाराच्या जवळपास मतदारांनी 'आम्हाला यापैकी एक ही उमेदवार नको !' असे दर्शवत 'नोटा' वर मतदान केले, याची विजयी-पराभूत उमेदवारांना यानिमीत्ताने आठवण करून द्यावीसी वाटते.